Rishabh Pant | ऋषभ पंतच्या प्रकृतीवर उर्वशीनंतर तिच्या आईने दिली प्रतिक्रिया

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने देखील सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीसाठी पोस्ट शेअर केली होती. उर्वशीनंतर आता तिच्या आईने रिषभ पंतसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये इंस्टाग्राम वॉर चांगलेच रंगले होते. अशा परिस्थितीत पंतच्या अपघाताची माहिती मिळताच उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्या पोस्टनंतर आता तिच्या आईने म्हणजेच मीरा रौतेला (Mira Rautela) ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मीरा रौतेला यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे,”सोशल मीडियावरच्या अफवा एकीकडे आणि ऋषभ पंतची तब्येतीकडे. तू लवकर बरा होशील. तुला आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचे नाव अजून रोशन करायचे आहे. देवाची तुझ्यावर कृपादृष्टी असो. तुम्ही सगळे  त्याच्यासाठी प्रार्थना करा.”

मीरा रौतेला यांच्या या पोस्टवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहे. यावर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला,”जावईबापू लवकर बरे होतील तुम्ही टेन्शन घेऊ नका.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला,”जावईबापू लिहायचं विसरून गेला तुम्ही.”

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.