Rishabh Pant | ऋषभ पंतला भेटायला गेली उर्वशी रौतेला? ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण

Rishabh Pant | मुंबई: भारतीय क्रिकेट पटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात (Accident) झाल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvshi Rautela) ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टनंतर उर्वशी चर्चेत आली होती. तिच्या पोस्टवर वापरकर्त्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं होतं. अशाच परिस्थितीत उर्वशीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर पुन्हा चर्चांना उधाण आला आहे.

क्रिकेटर ऋषभ पंतवर सध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अशात उर्वशी रौतेला मुंबईमध्ये त्याच रुग्णालयाच्या आजूबाजूला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीला धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे ती ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्याचे बोलले जात आहे.

उर्वशीने शेअर केलेल्या या फोटोला तिने कोणत्याही प्रकारचा कॅप्शन दिलेले नाही. मात्र, या फोटोमध्ये धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हा लोकेशन टॅग दिसत आहे. दरम्यान ऋषभ पंतला शस्त्रक्रियेसाठी डेहरादूनवरून मुंबई हलवण्यात आलं होतं. त्यानंतर उर्वशीची ही इंस्टाग्राम स्टोरी पाहता नेटकऱ्यांनी ती ऋषभला भेटायला गेल्याचा अंदाज लावला आहे.

Screenshot 2023 01 06 101242 Rishabh Pant | ऋषभ पंतला भेटायला गेली उर्वशी रौतेला? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण
Rishabh Pant | ऋषभ पंतला भेटायला गेली उर्वशी रौतेला? ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण

ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या कार अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री उर्वशी रौतालांना देखील सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीसाठी पोस्ट शेअर केली होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.