Rishabh Pant | ऋषभ पंतला मैदानावर परतण्यासाठी लागणार ‘एवढा’ वेळ, डॉक्टर म्हणाले…

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) ला अपघात (Accident) झाल्यानंतर क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोठा ब्रेक घ्यावा लागणार आहे. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला. त्यानंतर त्याच्या गाडीला आग लागली होती. ऋषभ पंत आता धोक्याच्या स्थिती बाहेर असला, तरी त्याला या अपघातामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे.

ऋषभ पंतला या अपघातामुळे क्रिकेटमधून मोठा ब्रेक घ्यावा लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऋषभ पंतला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते. दरम्यान, तो टीम इंडियाच्या वेळापत्रकातून बाहेर होऊ शकते. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 4 कसोटी मालिका आणि एक दिवसीय मालिकेसाठी अनुपस्थित राहणार, असे मानले जात आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.

त्याचबरोबर ऋषभ पंत यावर्षी आयपीएलचामध्ये देखील न खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलमध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स या संघाचे कर्णधार पद सांभाळतो. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीला आता नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. दरम्यान, संघाकडे डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोन कर्णधार पदासाठी चांगले पर्याय आहेत. या खेळाडूंनी आयपीएलसोबतच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे.

ऋषभ पंतच्या हेल्थ प्रसिद्धीपत्रकानुसार, ऋषभ पंतच्या कपाळावर दोन खोल कट आहेत. त्याचबरोबर त्याच्या गुडघ्यालाही गंभीर दुखापत झालेली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला सुदैवाने कोणतीही जीवघेणी दुखापत झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.