Rishabh Pant | दिल्लीत ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, डोक्याला झाली गंभीर दुखापत
Rishabh Pant | दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी परतताना त्याच्या कारचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रिषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पंतची प्रकृती स्थिर असून, त्याला डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वतः गाडी चालवत होता. गाडीमध्ये तो एकटाच होता. अपघात झाल्यानंतर त्याच्या गाडीला आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या रिषभची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
ऋषभ पंतला आत्तापर्यंत 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने 987 धावा आपल्या नावावर केल्या आहे. या धावा त्याने 22 च्या सरासरीने केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट केवळ 126 होता. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन अर्धशतके केली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, मोदींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
- Ajit Pawar | TET घोटाळा आमच्या काळात झाला असले तरी चौकशी करा – अजित पवार
- Winter Session 2022 | बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश होणार ; विधानसभेत मोठा निर्णय
- ICC Award 2022 | ‘क्रिकेटर ऑफ द इयर 2022’ नामांकन यादीत ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाले स्थान
- Eknath Khadse | “वेगळ्या विदर्भासाठी लढा देणारे नेते…” ; एकनाथ खडसेंची फडणवीसांना टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.