Rishabh Pant | वारंवार फ्लॉप होऊनही ऋषभ पंतला संधी का?
ऑकलॅंड : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये वनडे मालिकेचा पहिला सामना पार पडला. हा सामना ईडन पार्कवर खेळला गेला. या सामान्यादरम्यान देखील भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) चा खराब फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऋषभ पंत वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यांमध्ये ही अपयशी ठरला आहे. या सामन्यामध्ये ऋषभ पंत अवघ्या पंधरा धावा करून लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अशा परिस्थितीत टीम इंडिया सतत ऋषभ पंतला संधी देत आहे. पण आतापर्यंत रिषभ पंतला संधीचे सोने करता आले नाही.
आज ऑकलँड येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. दरम्यान, ऋषभ पंत आपला खराब फॉर्म मागे सोडून मोठी खेळी खेळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र तसे न होता पंत अवघ्या पंधरा धावा करून पॅवेलियनला परतला. लॉकी फर्ग्युसन या गोलंदाजानी ऋषभ पंतची विकेट घेतली.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेमध्ये ऋषभ पंतला भारताचा सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला त्या संधीचे सोने करता आले नाही. टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यांमध्ये सलामीला आलेल्या पंतने केवळ 6 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या टी-20 सामन्यात 11 धावा करून तो बाद झाला होता. पंतचा हा खराब फॉर्म सातत्याने सुरूच आहे. दरम्यान, त्याला कधीपर्यंत संधी मिळत राहील, असा सवाल क्रिकेट प्रेमींनी उचलला आहे.
ऋषभ पंतच्या शेवटच्या पाच डावांबद्दल बोलायचे झाले तर मागील पाच डावांमध्ये त्याने अनुक्रमे 6,3,6,11,15 धावा केल्या. 2022 मधील त्याची टी-20 कामगिरी पाहता त्याने यावर्षी 21 डावांमध्ये 21.21 च्या सरासरीने 364 धावा केले आहे. ऋषभ पंचा हा खरा फॉर्म असाच कायम राहिला तर हा प्रश्न टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे”; चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका
- Sanjay Raut | संजय राऊत यांच्या विरोधात ईडीची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार!
- Suryakumar Yadav | सूर्यकुमारच्या बॅटिंगवर ग्लेन मॅक्सवेलने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
- Navneet Rana | “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पू…”; नवनीत राणांचा शरद पवारांवर निशाणा
- Navneet Rana | “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”, नवनीत राणा कडाडल्या
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.