Rishabh Pant Accident | आईला भेटायला निघाला ऋषभ पंत, अन् मधेच…

Rishabh Pant Accident | दिल्ली: क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant) च्या अपघाताबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असून तो आता धोक्याच्या बाहेर आहे. दिल्लीहून घरी परतताना त्याच्या कारचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला. रुरकी येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंत त्याच्या आईला भेटायला निघाला होता. दिल्लीहून रात्री उशिरा तो एकटाच त्याच्या कार मधून निघाला होता.

रुरकी येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतला अचानक डुलकी लागल्यामुळे त्याचा अपघात झाला. तो स्वतः कार चालवत होता. त्याच्याबरोबर कारमध्ये कोणीही नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती आता ठीक असून तो बोलण्याच्या स्थितीत आहे. डेहरादून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या गाडीला धडकेनंतर आग लागली होती. स्थानिक लोकांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला डेहरादून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

या अपघातामध्ये पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याचबरोबर त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्या आहे. दरम्यान, पंतला लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

रिषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर  डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू  आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.