Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या अपघातानंतर कपिल देव यांनी केलं मोठं व्यक्त, म्हणाले…

Rishabh Pant Accident | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला. त्यानंतर त्याच्या गाडीने आग लागली होती. ऋषभ पंत आता धोक्याच्या स्थिती बाहेर असला, तरी त्याला या अपघातामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. या अपघातामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. त्याच्या अपघातानंतर चाहत्यांनी, माजी क्रिकेटपटूंनी आणि सध्याच्या खेळाडूंनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी कपिल देव (Kapil Dev) यांनी पंतच्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.

ऋषभ पंतच्या अपघातानंतर देश-विदेशातील क्रिकेटपटूंनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्या अपघातावर आपले मत मांडले आहे. दरम्यान, विश्वचषक विजेते कपिल देव यांनी देखील पंतच्या अपघातानंतर मोठं वक्तव्य केलं आहे.

ऋषभ पंतच्या अपघातावर कपिल देव म्हणाले की,”स्वतः कार चालवणे ऐवजी त्याने एक ड्रायव्हर ठेवायला हवा होता. ड्रायव्हिंग करताना खूप सतर्क राहावे लागते. आपण सहजपणे एक ड्रायव्हर ठेवू शकतो. पतंला एकट्याने गाडी चालवायची काहीच गरज नव्हती. मला माहित आहे की लोकांना लक्झरी गाडी चालवण्याचा छंद असतो. मात्र तुमच्यावर जबाबदारी देखील असतात. त्यामुळे त्याची काळजी घेत गोष्टींचे निर्णय घेतले पाहिजे.”

पुढे बोलताना ते म्हणाले की,”पंतने आता स्वतःची काळजी घ्यायला हवी. कारण त्याच्यापुढे दीर्घ क्रिकेट कारकीर्द आहे. त्याच्यासाठी ही एक शिकवण आहे. या अपघातानंतर तो सुरक्षित आहे यासाठी मी देवाचे आभार मानतो.”

ऋषभ पंत हेल्थ प्रसिद्धीपत्रकानुसार, पंतच्या कपाळावर दोन खोल कट आहेत. त्याचबरोबर त्याच्या गुडघ्यालाही गंभीर दुखापत झालेली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला सुदैवाने कोणतीही जीवघेणी दुखापत झालेली नाही.सध्या त्याच्यावर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर बीसीसीआय डॉक्टर आणि वैद्यकीय पथक त्याच्या संपर्कात आहे.

महत्वाच्या बातम्या