Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाने केली पोस्ट, म्हणाली…

Rishabh Pant Accident | दिल्ली: भारतीय स्टार क्रिकेट खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अपघाताबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. पंत धोक्याच्या बाहेर असला, तरी त्याला या अपघातामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. दिल्लीहून घरी जात असताना पंतच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर सध्या डेहरादून येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये इंस्टाग्राम वॉर चांगलेच रंगले होते. अशा परिस्थितीत पंतच्या अपघाताची माहिती मिळताच उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टचे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने ‘प्रार्थना करत आहे’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. यामध्ये एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”वहिनी रिषभ पंतचा अपघात झाला आहे.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”रिषभ भैय्या साठी प्रार्थना करत आहे, गोष्टींना कसं फिरवल्या जात आहे बघताय ना.”

दिल्लीहून घरी परतताना ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंत गाडी चालवत असताना त्याला अचानक डुलकी लागल्याने त्याचा हा अपघात झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.