Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या तब्येतीबद्दल BCCI सचिव जय शाह यांनी दिली दिलासादायक माहिती, म्हणाले…

Rishabh Pant Accident | दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झालेला असून, त्याची कार जळून खाक झाली आहे. डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ऋषभ पंतच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे.

जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. ट्विटरवर पोस्ट करत ते म्हणाले आहे की,”मी ऋषभ पंतसाठी प्रार्थना करत आहे. तो हळूहळू बरा होत आहे. माझे डॉक्टरांशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी बोलणं झालं आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असून तपासणी सुरू आहे. आम्ही त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्याला शक्य तेवढी मदत करण्यात येईल.”

दिल्लीहून घरी परतताना ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला. गाडी चालवताना झोप लागल्यामुळे त्याचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पंत स्वतः गाडी चालवत होता. गाडीमध्ये त्याच्याबरोबर कुणीच नव्हते.

ऋषभ पंतची गाडी धडकल्यानंतर तिला आग लागली होती. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला लगेचच डेहरादून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.