Rishabh Pant Accident | रिषभ पंतच्या तब्बेतीमध्ये सुधारणा, ICU मधून बाहेर

Rishabh Pant Accident | डेहराडून: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. तो आता धोक्याच्या स्थिती बाहेर असून, त्याला आयसीयूमधून बाहेर घालवण्यात आले आहेत.

रिषभ पंत (Rishabh Pant) च्या तब्बेतीमध्ये सुधारणा

ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. ऋषभ पंतचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की,”पंत ची तब्येत आता एकदम चांगली आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. त्यामुळे त्याला आता आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या पायाला वेदना होत आहे. पण सध्या त्याची एमआरआय चाचणी करण्याचा विचार नाही. ”

ऋषभ पंत आता धोक्याच्या स्थिती बाहेर असला, तरी त्याला या अपघातामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. या अपघातामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. त्याच्या अपघातानंतर त्याच्या चाहत्यांनी, माजी क्रिकेटपटूंनी आणि सध्याच्या खेळाडूंनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ऋषभ पंतला या अपघातामुळे क्रिकेटमधून मोठा ब्रेक घ्यावा लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऋषभ पंतला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते. दरम्यान, तो टीम इंडियाच्या वेळापत्रकातून बाहेर होऊ शकते. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 4 कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिकेसाठी अनुपस्थित राहणार, असे मानले जात आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.