Rishabh Pant Accident | “गरज पडली तर…” ; ऋषभ पंतच्या उपचाराबाबत BCCI ने दिली महत्त्वाची माहिती

Rishabh Pant Accident | दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. त्याच्यावर सध्या डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अशा परिस्थितीत पंतला उपचारासाठी मुंबईमध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईमध्ये त्याच्या लिगामेंटवर उपचार केले जातील.

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक शाम शर्मा म्हणाले आहे,”ऋषभ पंतला पुढील उपचारासाठी मुंबईला दाखल करण्यात येणार आहे. अपघातानंतर ऋषभ पंतवर डेहराडूनमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ऋषभ पंतला या दुखापतीतून सावरायला किती वेळ लागेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पंत खेळू शकणार नाही एवढे मात्र स्पष्ट आहे.

त्याचबरोबर अपघातानंतर ऋषभ पंतला आयपीएल 2023 मध्ये खेळणे जवळपास अशक्यच आहे. अशा परिस्थितीमध्ये दिल्लीला पंतच्या जागी नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. 2022 आयपीएल लिलावामध्ये दिल्लीने डेव्हिड वॉर्नरला आपल्या संघात सामील केले होते. दरम्यान, संघाकडे डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोन कर्णधार पदासाठी चांगले पर्याय आहेत.

ऋषभ पंतचा एमआरआय स्कॅनमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आढळून आली नाही. अपघातानंतर बीसीसीआय आणि डीडीए सातत्याने संपर्कात राहून त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवत होते. डीसीसीए प्रमुख शाम शर्मा स्वतः ऋषभ पंतची भेट घ्यायला आले होते. त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी देखील ऋषभ पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

महत्वाच्या बातम्या