Rishabh Pant | IPL 2023 मधून ऋषभ पंत बाहेर?, ‘हे’ खेळाडू करू शकतात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा भीषण अपघात झाला आहे. त्याच्यावर सध्या डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तो गंभीर जखमी झालेला असून, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघाचा भाग आहे. तो या संघाच्या कर्णधार पदावर विराजमान आहे. अपघातामुळे पंत यावर्षी आयपीएल खेळू शकणार नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला आता नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे.

ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या जागी ‘हे’ खेळाडू करू शकतात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व

अपघातानंतर ऋषभ पंतला आयपीएल 2023 मध्ये खेळणे जवळपास अशक्यच आहे. अशा परिस्थितीमध्ये दिल्लीला पंतच्या जागी नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. 2022 आयपीएल लिलावामध्ये दिल्लीने डेव्हिड वॉर्नरला आपल्या संघात सामील केले होते. दरम्यान, संघाकडे डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोन कर्णधार पदासाठी चांगले पर्याय आहेत. या खेळाडूंनी आयपीएलसोबतच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे.

आयपीएल 2014 ते 2021 पर्यंत डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद या संघाचा भाग होता. आयपीएल 2022 मध्ये दिल्लीने त्याला 6.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले होते. दरम्यान, दिल्लीने आयपीएल 2023 साठी त्याला संघात कायम ठेवले आहे. डेव्हिड वॉर्नर हैदराबादचे कर्णधार पद सांभाळले होते. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधार पदाचा चांगला अनुभव आहे.

पृथ्वी शॉबद्दल जर बोलायचे झाले, तर त्याच्याकडे देखील कर्णधार पद सांभाळण्याचा अनुभव आहे. या युवा खेळाडूने अंडर-19 क्रिकेटमध्ये कर्णधार पद सांभाळले आहे. या युवा खेळाडूकडे फारसा अनुभव नसला, तरी तो संघाचे नेतृत्व उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो. दिल्ली कॅपिटल्स आता कुणाकडे कर्णधार पद सोपवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.