ऋषी कपूर यांचे कमबॅक

बॉलिवूडचे चिंटू काका ऊर्फ अभिनेता हे या आजारातून ठणठणीत बरे झाल्याचे समजतेय. होय, कारण त्यांनी नुकतेच एक फोटोशूट करून घेतले आहे. या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले आहेत. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी केले आहे. अविनाश गोवारीकर यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यांच्या फॅन्सकडून या फोटोशूटला चांगलीच पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by rishi kapoor (@rishi_kapoor_rk) on

ऋषी कपूर वर्षभरापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. बराच काळ आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. याकाळात घरच्या आठवणीने ते अनेकदा हळवे झालेले दिसले. अनेक ट्वीटमध्ये त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती. याशिवाय आजारपणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी नीतू यांच्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले होते.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.