Ritesh & Genelia Deshmukh | 10 वर्षानंतर रितेश आणि जेनेलिया दिसणार ‘या’ चित्रपटात एकत्र

मुंबई: बॉलीवूड Bollywood  मधील सर्वात लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख Ritesh Deshmukh आणि जेनेलिया देशमुख Genelia Deshmukh ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटानंतर एकत्र दिसले नाहीत. चाहते त्यांना पुन्हा एकदा परत बघण्यासाठी आसुसले आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून तब्बल दहा वर्षानंतर ही मराठमोळी जोडी लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. वेड हा चित्रपट रितेश आणि जेनेलिया या दोघांसाठी खूप खास आहे. कारण या चित्रपटाद्वारे जेनेलिया मराठी इंडस्ट्रीज पदार्पण करणार आहे. तर त्याचबरोबर रितेशचा वेड हा पहिला चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन तो स्वतः करत आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्या केमिस्ट्रीने नेहमीच पडद्यावर अधिराज्य गाजवले आहे. प्रेक्षक आता त्यांच्या वेड या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. नुकताच सोशल मीडियाद्वारे वेड या चित्रपटाचे पोस्टर समोर आले असून ते लोकांना खूप आवडले आहे.

रितेश आणि जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

जेनेलियाने आपल्या ट्विटर हँडलवर ‘वेड’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने हे ट्विट मराठी भाषेत केले असून तिने त्या मध्ये लिहिले आहे की, माझा जन्म महाराष्ट्रातलाच.मी अभिनयाला सुरवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले.तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.

जेनेलियाकडून शेअर केले गेलेल्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असून जाते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे.

कधी होणार ‘वेड’ रिलीज

जेनेलियाने ट्विटर बरोबर वेड या चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्राम वर देखील शेअर केले आहे. पोस्टर सोबतच तिने त्यामध्ये चित्रपट रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. जेनेलियाने शेअर केलेल्या पोस्टानुसार वेळ हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जेलेनियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर वेडचे पोस्टर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ” वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक.
आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.”

रितेश जेनेलिया सह ‘वेड’ मध्ये आहेत हे कलाकार

वेड या चित्रपटांमध्ये रितेश आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये सलमान खान देखील महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये जिया शंकर, अशोक सराफ, शुभंकर तावडे इत्यादी अभिनेते देखील दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.