Rituja Latke । अंधेरी पोटनिवडणूकीत धक्कादायक ट्विस्ट; थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी

Rituja Latke । मुंबई : अंधेरी निवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भाजपाने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानं लटके यांचा विजय जवळपास निश्चित माणला जात आहे. मात्र आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. त्यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे, सात दिवसांच्या आत उत्तर न आल्यास आपण न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही मिलिंद कांबळे यांनी दिला आहे.

यानंतर आता पुन्हा एकदा ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुढे मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे अंधेरी पोट निवडणूक चर्चेत आली आहे. त्यातच आता अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे आणखी ट्विस्ट आला आहे. यानंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.