Rituja Latke । ऋतुजा लटके यांच्या अडचणी वाढणार?, निवडणूक आयोगाकडे तक्रार

Rituja Latke । मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या. यामध्ये भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला आणि अपक्ष म्हणूनही लढणार नाहीत असा निर्णय घेतला. यानंतर ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाली.

ऋतुजा लटके यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भाजपाने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानं लटके यांचा विजय जवळपास निश्चित माणला जात आहे. मात्र आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीव आक्षेप घेण्यात आल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. त्यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे, सात दिवसांच्या आत उत्तर न आल्यास आपण न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही मिलिंद कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.