लोकांना एकमेकांची मदत करताना पाहून रिया चक्रवर्ती झाली भावुक

मुंबई : रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत लोकांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. आता या कठीण काळात लोक एकमेकांना मदत करताना पाहून रियाचे मन भरून आले आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने या गोष्टीचा आनंद व्यक्त केला.

रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मदतीच्या काळात एकमेकांच्या बाजूने उभ्या असलेल्या लोकांचे कौतुक केले आहे. तिने लिहिले की, “या कठीण काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत हे पाहून मला आनंद होतो. हे इतिहासात लिहिले जाईल. सगळ्यांनी सोबत ही लढाई जिंकूया. दाखवून देऊ की जगात पुन्हा एकदा माणुसकीची सुरुवात होत आहे. विश्वास ठेवा.”

काही काळापूर्वी रियाने एक पोस्ट शेअर केली होती आणि लोकांकडे मदतीचा हात पुढे केला. त्यात तिने लिहिले, ‘’या कोरोनाच्या कठीण काळात सोबत राहणे महत्वाचे आहे. आपण जशी जमेल तशी सर्व मदत करा. मग ती छोटी असो किंवा मोठी. मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला मदत करू शकत असल्यास मला थेटा, मेसेज करा. मी माझा पूर्ण प्रयत्न करेन. काळजी घ्या.’

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा