तगड्या अभिनेत्रींवर मात करत मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रिया चक्रवर्ती आली टॉपवर

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव ‘द टाइम्स’च्या ‘द मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०’ च्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. या यादीत वर्षभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले, अशा महिलांच्या नावाचा यादीत समावेश केला जातो.

गेल्यावर्षी रिया चक्रवर्ती सातत्याने बातम्यांमध्ये होती. अर्थात तिच्या नावाची चर्चा नकारात्मक गोष्टींसाठीच जास्त झाली. तसेच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रियाला तुरुंगातही जावे लागले होते. सध्या रिया जामिनावर बाहेर आहे.

एडलिन कॅस्टोलिने दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिशा पाटनीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. कियारा आडवाणी, दीपिका पादुकोण, कतरीना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, अनुप्रिया गोएंका, रुही सिंह आणि अवित्री चौधरी अनुक्रमचे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा