“आपल्या मतदारसंघातील रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार”; काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान

मुंबई : गेल्या महिन्यात शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे केलेत, इथले रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत. पाटलांच्या या वक्तव्यावर नंतर भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.

सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली होती. मात्र यानंतर लगेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागितली होती. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले.

यानंतर आता झारखंड मधील एका काँग्रेस आमदाराने आपल्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणौतच्या गालासारखे बनवणार असल्याचं वक्तव्य केलंय. आमदार डॉ. इरफान अन्सारी असं या आमदारच नाव आहे.  त्यांनी शुक्रवारी पोस्ट केलेल्या स्वत: तयार केलेल्या व्हिडीओमध्ये, डॉ इरफान अन्सारी म्हणतात की, “जामतारा येथे जागतिक दर्जाच्या १४ रस्त्यांचे बांधकाम लवकरच सुरू होईल. हे रस्ते अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त चांगले असतील, याची मी खात्री देतो.” असं वक्तव्य केलं आहे. डॉ. इरफान अन्सारी आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा