InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या घरी चोरी, चौकीदारावर संशय

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या घरी चोरी झाली आहे. वाघेला यांच्या घरातून सुमारे तीन लाखांची रोकड आणि दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. पोलिसात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात वाघेला यांचा ‘चौकीदार’  संशयित आरोपी असल्याचं सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. चोरीची ही घटना वाघेला यांच्या गांधीनगरमधील निवासस्थानी घडली.

वाघेला यांनी चार वर्षांपूर्वी बासुदेव उर्फ शांभू गुरखा नावाच्या व्यक्तीला सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला ठेवलं होतं. तो पत्नी आणि मुलांसह इथे राहत होता. पण ऑक्टोबर महिन्यात मुलांना शाळेत घालायचं आहे, असं सांगून तो पत्नी आणि मुलांसह घरातून निघून गेला. तेव्हापासून तो परतलेला नाही, अस तक्रारीत लिहिले आहे.

शंकर सिंह वाघेला यांनी दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply