Robby Clotrane | हॅरी पाॅटर चित्रपटातील राॅबी कोल्टरेनने वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली : रॉबी कोल्टरेन यांचा जन्म ३० मार्च १९५० ला स्कॉटलंडमध्ये एका शिक्षक आणि डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी ग्लासगोमध्ये झालाग्लासगो आर्ट स्कूलमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर एडीनबर्गमधील मोरेय हाऊस कॉलेज ऑफ एज्यूकेशन येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. रॉबी कोल्टरेन यांनी विनोदी अभिनेता म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर हॅरी पाॅटर मधून त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली. याच प्रसिद्ध राॅबी कोल्टरेन यांनी अखरेचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे.
१९९० च्या दशकातील क्रॅकरमधील डिटेक्टीव्हच्या भूमिकेमुळं रॉबी कोल्टरेन चर्चेत –
१९९० च्या दशकातील क्रॅकरमधील डिटेक्टीव्हच्या भूमिकेमुळं रॉबी कोल्टरेन चर्चेत आले होते. त्यांना ब्रिटीश अकादमी टेलिव्हिजनचा पुरस्कार सलग तीन वर्ष मिळाला होता. २००१ ते २०११ मध्ये आलेल्या हॅरी पॉटर फिल्मस च्या मालिकेत त्यांनी हॅरी पॉटरच्या मेंटरची भूमिका पार पाडली होती. जेम्स बाँड थ्रिलर्स गोल्डन आय आणि द वर्ल्ड इज नॉट इनफमध्ये देखील त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती.
हॅरी पॉटरमधील रुबेस हॅग्रीड ही भूमिका साकरणाऱ्या रॉबी कोल्टरेन यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. हॅरी पॉटरशिवाय रुबेस रॉबी कोल्टरेन ब्रिटीश टीव्ही मालिकेत क्रॅकरमधील भूमिकेसाठी ओळखले जायचे. राॅबी कोल्टरेन यांच्या निधनानंतर ट्विटरवर अनेकांनी त्यांच्या आठवणी जाग्या करत भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, हॅरी पॉटरमधील हॅग्रीडची भूमिकेला रॉबी कोल्टरेनयांनी न्याय दिल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच रॉबी कोल्टरेन यांच्या प्रवक्त्या बेलिंदा राईट यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Londhe | “बाळासाहेब यांचं नाव घ्यायचं अन्…”; काँग्रेसचा शिंदे गटावर हल्ला
- Thane | संतापजनक! आधी तरुणीला छेडलं अन् जाब विचारताच तिला फरफट नेलं
- Uddhav Thackeray | ठाकरे गटाची ‘मशाल’ धोक्यात; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल
- Prakash Ambedkar | “भाजपला जसे उद्धव ठाकरे नको होते, तसंच त्यांना एकनाथ शिंदे देखील नको आहेत, फक्त…”, प्रकाश आंबेडकर
- Ajit Pawar | “त्याची किंमत सर्वांनाच…”; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.