Rohit Pawar | “गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय” रोहित पवार आक्रमक!

Rohit Pawar | मुंबई : महाराष्ट्रासंदर्भात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, कर्नाटक सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. आता कर्नाटकने नवा उपद्रव केला आहे. सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यावर दावा करण्याबाबत कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

रोहित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेली आहे. एकीकडे सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडे आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे,” असे रोहित पवार म्हणाले.

“दोनच दिवसांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण अभिवादन केलं आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते”, असे रोहित पवार म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ? –

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्राने गांभीर्याने विचार करावा असेही बोम्मई यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे पाण्याच्या प्रश्नावर कर्नाटकात सामील होऊ इच्छित असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जत तालुक्यांकडे कर्नाटकची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.