Rohit Pawar | “छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची…”; राज्यपालांच्या विधानावर रोहित पवार संतापले

Rohit Pawar | अहमदनगर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी यांनी म्हटलंय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधलाय.

“राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात”, असा खोचक टोला रोहित पवारांनी राज्यपालांना लगावला आहे.

“पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही”, असं म्हणत त्यांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं आहे. “विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते”, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय.

नेमकं काय म्हणालेत राज्यपाल?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.