Rohit Pawar | “ज्यांना हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हे माहिती नाही…”, रोहित पवारांनी घेतला तानाजी सावंतांचा समाचार
Rohit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना आपल्या मतदार संघात येऊ नका, असं सांगण्यासाठी दहा फोन केले असल्याचं राम शिंदे (Ram Shinde) यांनी सांगितलं आहे. यावर रोहित पवार यांनी ट्विट करत राम शिंदे तसेच तानाजी सावंत यांचा खूब समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
ज्याला पैसा आणि अहंकाराची ‘खाज’ आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहीत नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो अश व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? असा सवाल करत राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका, ‘खेकड्या’ची चाल लोकं स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा…. मग मैदानात बघू!, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांचं ट्विट :
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 29, 2022
दरम्यान, तानाजी सावंत यांनी अहमदनगरमध्ये बोलताना रोहित पवारांवर केली होती. येत्या 2024 ला हातात झाडू घेऊन हा मतदारसंघ आपल्याला साफ करायचा आहे. एका ठिकाणी जनशक्ती आहे तर एका ठिकाणी धनशक्ती आहे. त्यांना वाटतं धनशक्तीच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र विकत घेऊ आणि अमेरिकेला जाऊ,असं सावंत यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli । पाकिस्तानी चाहत्याने वाळूवर रेखाटलं विराट कोहलीच चित्र
- Rohit Pawar | “हिंमत असेल तर पुरावा द्या..मैदानात बघू”; रोहित पवारांचे ‘या’ नेत्याला आव्हान
- MVA | “नार्वेकर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी…”; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचा शिंदे सरकारला टोला
- SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी बंपर भरती
- MNS | “… तर मुंबई पोखरणारी घुस निघाली”, मनसेचा किशोरी पेडणेकरांना खोचक टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.