Rohit Pawar | ‘डबल-ट्रिपल इंजिन’ म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. आज विरोधकांची कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये बैठक होणार आहे. तर सत्ताधारी पक्षानं दिल्लीत बैठक बोलावली आहे.

या बैठका सुरू असताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Foxconn company is going to set up a new plant worth 8800 crores in Karnataka

फॉक्सकॉन कंपनी कर्नाटकमध्ये तब्बल 8800 कोटींचा नवा प्लांट उभारणार आहे. या प्रकल्पामुळं कर्नाटकमधील 15000 लोकांना नव्यानं प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

यावरूनच रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ‘डबल-ट्रिपल इंजिन’ म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “#Foxconn कंपनी कर्नाटकात ८८०० कोटींचा नवा प्लांट उभारत असून इथं नव्याने १५००० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

#कर्नाटक सरकारच्या यशस्वी प्रयत्नांनी ‘डबल-ट्रिपल इंजिनचं सरकार’ म्हणवल्या जाणाऱ्या राज्यालाही मागं टाकत हे ‘डबल-ट्रिपल इंजिन’ म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ असल्याचं सिद्ध केलं.

असो! महाराष्ट्र सरकारही युवांना रोजगार मिळावा म्हणून वेळात वेळ काढून गुंतवणूक आणण्यासाठी कर्नाटकप्रमाणे प्रयत्न करेल, अशी आशा करूयात!”

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बंगळूर शहरामध्ये विरोधकांची (Rohit Pawar) बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहे. आज सकाळीच हे नेते बैठकीसाठी बंगळूरूला रवाना झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44vzIux