Rohit Pawar | दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार – रोहित पवार

Rohit Pawar | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. तर आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार आंदोलन करताना दिसले आहे.

दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या आंदोलनानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

The youth of Karjat-Jamkhed must get employment – Rohit Pawar 

विधिमंडळाच्या पायऱ्यावर रोहित पवार (Rohit Pawar) आंदोलन करताना दिसले आहे. कर्जत-जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

“माझ्या मतदारसंघातील #MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार! आता अखेरचा पर्याय! #उपोषण.

रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आणि देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेजवळ, विधिमंडळ आवार, मुंबई”, असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, निधी वाटपावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सध्या निधी वाटपाचा जो प्रकार समोर आला आहे, तो पैशांचा अपहार झालेला दिसत आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप एक संशोधनाचा विषय झाला आहे. कारण भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी दिल्याचं मी ऐकलं आहे. हे ऐकून मला मोठा धक्का बसला आहे. त्यांना शांत करण्यासाठी एवढा निधी देण्यात आला आहे.”

“सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी देशभरातील प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहे. या अधिवेशनामध्ये त्यांना मणिपूर प्रकरणावर चर्चा करायची आहे.

मात्र, नरेंद्र मोदी संसदेमध्ये याबद्दल बोलायला तयार नाही. मोदींनी मणिपूरवर संसदेबाहेर जे वक्तव्य केलं आहे, त्यांना ते संसदेत करण्याची गरज आहे. मात्र, देशामध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3K6zS3t