Rohit Pawar | देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची भीती आम्हाला नाही; तर ती एकनाथ शिंदेंना आहे : रोहित पवार
Rohit pawar | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना ‘जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे, असं विधान केलं होतं. त्याच्या या विधानावर अनेक नेत्यांनी पलटवार देखील केला आहे. तसचं फडणवीसांचा नक्की निशाणा कोणावर आहे? त्याच्या या विधानातून त्यांना काय सांगायचं आहे? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत. तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) टीका केली आहे. याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना टोला देखील लगावला आहे.
फडणवीसांचं विधान आमच्यासाठी नाही, तर शिंदेंसाठी आहे : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ हे विधान केलं ते आमच्यासाठी नव्हतं तर ते विधान एकनाथ शिंदेसाठी होत. तर आम्हाला त्यांच्या असल्या कोणत्याच शब्दाची कोणतीही भीती नाही. याची भीती खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटायला हवी. जर देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत आहेत, पण ते कोणत्या पदावर येतील, याचं उत्तर फक्त एकनाथ शिंदे यांनी द्यावं, असा टोला देखील रोहित पवार यांनी शिंदेंना लगावला आहे.
(Devendra Fadnavis’ statement is not for us, but for Eknath Shinde: Rohit Pawar )
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दौरा केला. त्यानंतर कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी “पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे ‘ मी पुन्हा येणार..’ तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय चर्चना उधाण आलं आहे. तर लवकरच सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार आहे . यामुळे जर 16 आमदार अपात्र ठरले तर महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलताना पाहायला मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Uddhav Thackeray | “शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख…” ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- Sanjay Raut | “हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना रोखून दाखवा” : संजय राऊत
- Uddhav Thackeray | रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोध, म्हणाले…
- IPL 2023 | केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एंट्री
- Sanjay Shirsat | …म्हणून शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम : संजय शिरसाट
Comments are closed.