Rohit Pawar | धक्कादायक! पुण्यातील रोहित पवारांचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

Rohit Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three people have tried to set fire to Rohit Pawar’s public relations office in Hadapsar

रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयाला तीन जणांनी आग लावल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं आहे. रोहित पवारांचं हे जनसंपर्क कार्यालय हडपसर परिसरातील सृजन हाऊस इमारतीमध्ये आहे.

या कार्यालयाला शनिवारी मध्यरात्री तीन जणांनी आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान कार्यालयासमोर एक सायकल जळून खाक झाली आहे.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक भूमिका घेत आहेत. यावरूनच हा प्रकार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

या घटनेनंतर रोहित पवार यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ झाली आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या जनसंपर्क कार्यालयाला आग लावणारे तरुण नेमके कोण आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचा हात आहे का? असा देखील सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3rnq4vi