Rohit Pawar | भाजपकडून देशातील आयडॉल बदलण्याचा प्रयत्न होतोय का? – रोहित पवार

Rohit Pawar | पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील यावर गोलमाल उत्तरे दिली. त्यामुळे भाजपवर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्र, देशातील आयडॉल बदलण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महारांचा विचार आपण घेऊन आपण पुढे जात असतो. हे सर्व थोर व्यक्ती आहेत. यांनी स्वता त्याग केला. म्हणून आपण त्या ठीकाणी योग्य पद्धतीने जगत आहोत. हे आपल्या सगळ्यांचे आयडॉल आहेत. जर भाजपमधील लोक बोलतात आणि तुम्ही त्यावर काहीही बोलत नाही. त्याला विरोध करत नाही. मग कदाचित हे सर्व आयडॉल , देशातील राज्याती या आयडॉल बदलण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे रोहित म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी केली राज्यपालांची पाठराखण – 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे, देशाचे आणि आपल्या सर्वांचे आदर्श राहतील. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत. याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. याबाबत राज्यपालांच्या मनात काही शंका असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे राज्यपालांच्या शब्दांचा निश्चितच चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असे मला वाटते.

त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, मी त्रिवेदी यांचे वक्तव्य नीट ऐकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली आहे, त्यावर ते काहीही बोलला नाही.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.