Rohit Pawar | महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवारांचं ‘आत्मक्लेश’ आंदोलन

Rohit Pawar | मुंबई :  गेल्या काही दिवसांपुर्वी भाजप (BJP) पक्षाच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाजांचा अवमान करणारे वक्तव्य केली आहेत. यावरुन विरोधक प्रचंड संतापले आहेत. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवारांनी हे आंदोलन केलं आहे.

याबाबत घोषणापत्र देखील जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात जमल्याने महाराजांवर प्रेम करणा-या महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला, अस्मितेला आणि देशातील शिवप्रेमींच्या भावनेला वे पोचत आहे. त्यामुळे अत्यंत उद्विपणे शिवप्रेमी मावळ्यांच्यावतीने पत्राच्या माध्यमातून या भावना मांडत आहे महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच महान अस राज्य आहे. या राज्याचा भूगोल जसा वैविध्यपूर्ण आहे तसा इतिहासही समृह आणि प्रेरणादायी आहे, असं घोषणापत्रात लिहिलं आहे.

स्वराज्याची उभारणी करणारे छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, डा. बाबासाहेब आबेडकर पुग्यश्री अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा अनेक महान व्यक्तिमत्वांचे परिश्रम आणि अनन्त महात्म्या विचाराच्या पायावर आज आपला महाराष्ट्र उभा आहे. म्हणून अन्य कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र हा नेहमीच उजना राहिला आहे, असं घोषणापत्रात लिहिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पती शिवराय, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्याची जणू राजकारण्यांमध्ये साचि लागल्याचे दिसत आहे. विशेषतः परराज्यातून येऊन विविध उच्च पदांवर नसलेल्यांकडून वारंवार अवमान होत असताना तो निमूटपणे पहात असणे हे मनाला अत्यंत वेदना देणार आहे. चूक ही एक वेळ होऊ शकते परंतु वारवार होत असेल तर ती चूक नसते तर जाणीवपूर्वक आणि तशीरपणे रचलेलं एक यंत्र जमते काही छुपे अजेंडे सेट करण्यासाठी तर हे यंत्र रचल जात नाही ना, अशी शंका सामान्य लोकांच्या मनामध्ये येतेय छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती-धर्माच्या माळव्यांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली, असं देखील ते म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.