Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: बुलढाणा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर 08 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला असल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विट करत दिली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

सरकारला राज्यातील महिला आणि मुलींची सुरक्षा करता येत नसेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बुलढाण्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हा निर्लज्जपणाचा कळस असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडल्याचं हे लक्षण असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

A 35-year-old woman was gang-raped by eight people in Buldhana

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “बुलडाण्यात ३५ वर्षाच्या महिलेवर आठ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला.. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी सत्ताधारी गटाच्या आमदाराला तीन तास पोलिस ठाण्यात ठिय्या द्यावा लागतो..

हे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं लक्षण आहे. राज्यातील महिला व मुलींची सुरक्षा करता येत नसेल तर या सरकारला एक क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.”

दरम्यान, राज्य सरकारमध्ये शिंदे-फडणवीस आणि पवार यांचा समावेश आहे. मात्र, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या ट्विटमध्ये फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टॅग केलं आहे.

यावरून नेटकरी रोहित पवारांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना दिसले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवारांना टॅग करायला पाहिजे, असं एका वापरकर्त्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NJryHG