Rohit Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Rohit Pawar | मुंबई : राज्यातील अनेक राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आयोधा दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा नोहेंबर महिन्यात होणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार (Rohit Pawar)
अयोध्या दौरा कोणाला करायचा असेल तर त्यांनी करावा, मी स्वतः गेलो आहे, मी जेव्हा गेलो तेव्हा कुटुंबासाठी गेलो होतो. याशिवाय मी धर्मामध्ये राजकारण करत नाही तर अशा करूया अयोध्या दौऱ्याचे राजकारण त्यांच्या हातून घडणार नाही, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन दर्शनसाठी जाणार असल्याने विरोधकांकडून टोकदार टीका न होता, संयमाने प्रतिक्रिया दिली जात असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिले होते. महंतांनी दिलेले निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यानुसार हा दौरा आयोजित केल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात किशोरी पेडणेकरांची उडी, म्हणाल्या…
- IND vs NED T20 World Cup | विराट, रोहित आणि सूर्यकुमारचे अर्धशतक, नेदरलँड्ससमोर 180 धावांचे लक्ष
- PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांना मिळवता येणार दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या
- Ravichandran Ashwin। मोहम्मद नवाजचा चेंडू वाईड गेला नसता, तर मी निवृत्ती घेतली असती, अश्विनचे धक्कादायक विधान
- IND vs NED T20 World Cup | केएल राहुल बाद नव्हता! रोहित स्वार्थी कर्णधार, सोशल मीडियावर टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.