Rohit Pawar | “राज्यपालांची वक्तव्यं भाजप नेत्यांना आवडतात का?”; रोहित पवारांचा खोचक सवाल

Rohit Pawar | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं.

हे वाद ताजे असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री रोहित पवार  (Rohit Pawar) यांनी राज्यपालांसह भाजपाचाही चांगलाच समाचार घेतला आहे.

“भाजपचे नेते दिल्लीत बसून काही विधानं करतात. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले तरी महाराष्ट्रातील भाजपचे नेते त्यांना विरोध का करत नाहीत? याचा अर्थ राज्यातील भाजप नेत्यांना त्यांची विधानं आवडतात का?”, असा सवाल आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

राज्यपाल गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांची पातळी कळते असा टोलाही रोहित पवारांनी यावेळी लगावला. पुढे ते म्हणाले, राज्यपाल हे संविधानिक पद आहे, राज्यपालांनी कुठलही राजकीय विधान करू नये, तसेच त्यांनी असांस्कृतिक विधानं करू नयेत असा अलिखित नियम असला तरी वादग्रस्त विधानं करुन त्यांच्याकडून वातावरुन गढूळ केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.