Rohit Pawar | रोहित पवारांना मोठा दणका; पवारांच्या अडचणीत वाढ
Rohit Pawar | मुंबई : सध्य राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) राजीनाम्यावरुन चर्चेना उधाण आलं आहे. तर आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक देखील पार पडली. यातून शरद पवारांनी राजीनामा माघारी घ्यावा असं निवेदन करण्यात आलं. यामुळे आता सर्वाचं लक्ष शरद पवारांच्या भूमिकेकडे लागलं असतानाच दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पवारांना ( Rohit Pawar ) यांना मोठा दणका बसला आहे.
रोहित पवारांना आयुक्तांकडून दणका (Rohit Pawar)
बारामतीच्या एग्रो कारखाण्याला तब्बल साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसचं या कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील भाजपचे आमदार राम शिंदेंनी केली होती. याचप्रमाणे 15 ऑक्टोबर च्या आधी जर साखर कारखाने सुरू केले तर दंड आकारण्यात येईल असं सांगण्यात आलं होत. परंतु रोहित पवार यांचा कारखाना 10 ऑक्टोबर 2022 लाच सुरू झाल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता साखर आयुक्तांनी रोहित पवारांना चांगलाच दणका दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणी आयुक्तांनी एक समिती नेमून चौकशी केली, त्यानंतर रोहित पवारांच्या बारामती अग्रो साखर कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसचं राम शिंदे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असल्याने कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sharad Pawar | कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
- Ajit Pawar | निवड समितीचे निर्णयावर अजित पवार नाराज? काहीचं प्रतिक्रिया न देता पडले बाहेर
- Sharad Pawar | कार्यकर्ते आक्रमक! शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली
- Chhagan Bhujbal | पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार नाही राहिले, तर आम्ही उपोषणाला बसू – छगन भुजबळ
- Sharad Pawar | मोठी बातमी! निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला
Comments are closed.