Rohit Pawar | “हा प्रयत्न सरकारला कदापि शोभणारा…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केलेला हा प्रयत्न सरकारला कदापि शोभणारा नाही, अशा शब्दात रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत जयंत पाटील ईडी प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “जयंत पाटील साहेबांना आलेल्या #ED नोटीसीचा कर्नाटक निकालाशी संबंध असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विनाकारण त्रास देऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा होत असलेला प्रयत्न हा सरकारला कदापि शोभणारा नाही.”

जयंत पाटील इडी चौकशीवर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले, “भारत सरकारच्या तपासणी यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जातात हे आपल्याला माहित आहे. पहिल्यांदा याचा वापर माझ्यावर झाला होता. त्याआधी ईडी प्रकरण काय? हे कुणालाच माहीत नव्हतं. वेळोवेळी देशभरामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा रीतीने ईडीचा वापर केला जातो.”

पुढे बोलताना ते (Chagan Bhujbal) म्हणाले, “भीती निर्माण करू नका. त्याचबरोबर दहशतीचे वातावरण निर्माण करू नका, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचललं गेलेलं नाही. त्यामुळे कितीही वेळा चौकशी झाली तरी काहीही निष्पन्न होणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43eRAJ6

You might also like

Comments are closed.