Rohit Pawar । “अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…”, रोहित पवारांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Rohit Pawar । बारामती : राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं आहे. अशातच आता लंके यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही सूचक विधान केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे, असं विधान रोहित पवार यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

पुढे ते म्हणाले, “एखादी ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल, ज्याचा प्रशासनावर वचक असेल आणि त्यांची काम करण्याची पद्धत लोकांना माहीत असेल. तेव्हा प्रशासनाचीही निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. निर्णय लवकर घेतले तर लोकांनाही याचा फायदा होत असतो” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

“अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असं अनेक लोकांचं मत आहे. माझंसुद्धा हेच मत आहे. पण शेवटी आपल्याला आकड्यांचं समीकरण लक्षात घ्यावं लागेल. येत्या काळात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. निलेश आणि नितेश राणे यांना माझ्या मतदारसंघात यायचं असेल तर या. पण निवडून कुणाला द्यायचं हे राज्यातील लोकच ठरवणार. मी हवेत बोलत नाही. माझा माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील भाष्य केलं. रोहित पवार म्हणाले, अयोध्या दौरा केला पाहिजे मात्र, धर्माचं राजकारण करू नये शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा देखील केला पाहीजे त्याबरोबर शेतकऱ्यांना मदत देखील करायला पाहिजे असं पवार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.