Rohit Pawar । “…ही भाजपची काम करण्याची पद्धत”; ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार यांचा हल्लाबोल

Rohit Pawar । पुणे :  C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Projec) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला नेले जात आहेत. याचं खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर फुटत आहे. याचा विचार व्हावा. महाराष्ट्र कमी पडतोय असं नाही. गुजरात जास्त पुढे पळतोय. हे प्रकल्प इथं आले असते तर रोजगार उपलब्ध झाले असते. छोटे मोठे उद्योग उभे राहिले असते, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. गुजरात निवडणूक जिंकावी म्हणून हा प्रकल्प तिकडे नेला जातोय का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. काही लोकांना पुढं करायचं त्यांचं नाव खराब करायचं, ही भाजपची पद्धत आहे, असा टोला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला लगावलाय.

ज्याप्रमाणे रुपया कमकुवत होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही, तर गुजरात सरकारचं यश असल्याचं ते म्हणालेत. गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातला नेले जात आहेत. यामुळे ती निवडणूक भाजप कदाचित जिंकेलही. परंतु या खेळात महाराष्ट्राच्या युवांचं भवितव्य चिरडलं जातंय आणि सर्वच राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत आहेत. हे दुर्दैवं असल्याचं पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नोटांवर लावण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली होती. यावर बोलताना पवार यांनी राणेंवर टीका केली. हवेत बोलायच म्हटलं तर काहीही बोलता येतं. कोणाचाही फोटो लावा. त्यापेक्षा तरुणांच्या पोटाच काय? विकासाबद्दल बोला, कामाबद्दल बोला,लोकं आता हुशार झाली आहेत, अशा शब्दात पवार यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.