Rohit Pawar | “40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात सरकार व्यस्त”; रोहित पवार यांचा हल्लाबोल

Rohit Pawar | पुणे : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केलीय.

“40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात शिंदे व्यस्त आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय. तरुणांना रोजगार नाहीये. महिलांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होतंय “, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरही रोहित पवार म्हणाले, “तेजस्वी यादव चांगला नेता आहेत. त्यांचं काम चांगलं आहे. तरूण वयात त्यांनी जे काम केलंय ते कौतुकास पात्र आहे. त्यांमुळे आदित्य त्यांना भेटत असतील तर त्यात काही वावगं नाही.”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर देखील रोहित पवारांनी भाष्य केलंय. “दोनच दिवसांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण अभिवादन केलं आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते”, असे रोहित पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेली आहे. एकीकडे सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडे आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.