InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राष्ट्रवादीचे तीन ‘युवा रोहित’ माणदेशात एकत्र !

जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार, दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हणमंतराव देशमुख यांचे पुत्र रोहित हणमंतराव देशमुख हे तीन युवा नेते २७ जानेवारीला सांगली जिल्हयातील दिघंची गावात युवा शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. 

आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हणमंतराव देशमुख यांचे पुत्र रोहित यांनी हा युवा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. 

या युवा शेतकरी मेळाव्यात आटपाडी तालुक्यातील दुष्काळ, डाळिंब शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, अपुऱ्या राहिलेल्या पाणीयोजना या विषयी चर्चा होणार आहे. रोहित पवार आणि रोहित पाटील यांची आजवर एकदाही भेट झालेली नाही या मेळाव्याच्या निमित्ताने पवार आणि पाटील घराण्याची तिसरी पिढी एकत्र आली आहे.

रोहित पवार कोण आहेत?

रोहित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू आहेत. पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा रोहित हा मुलगा आहे, म्हणजेच अजित पवारांचे नात्याने पुतण्या आहेत . रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.

पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.

रोहित पवार सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. कर्जत, हडपसर, पुरंदर येथून त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण पवार यांनी याबाबत अजून भाष्य केलेले नाही.

रोहित पाटील

दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईला आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत यांनी २०२४ सालचे आमचे तासगावचे उमेदवार रोहित पाटील असं सांगत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीपासूनच ते त्यांच्या आई आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळताना दिसतील आणि नंतर थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.