InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राम कदम बोलले तेव्हा पूनम महाजन गांधारीच्या भूमिकेत होत्या का?- रोहित पवार

- Advertisement -

पुणे : “पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे,” असे भाजपचे आमदार राम कदम म्हणाले तेव्हा खासदार पूनम महाजन यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का, असा सवाल पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी खासदार पूनम महाजन यांना विचारला आहे.

भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली होती. विरोधकांची महाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन असल्याचा घणाघातही त्यांनी केला होता. त्यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रोहीत पवार यांनी खासदार पूनम महाजन यांना त्यांच्यात पक्षातील आणखी दोन उदाहरणे दिली आहेत.  गिरीश महाजन आणि गिरीश बापट या दोन  नेत्यांच्या विधानांची आठवन रोहीत यांनी करून दिली.  “गिरीश महाजन म्हणाले होते, “दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.” गिरीश बापट म्हणाले होते, “तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.  हि विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता.”अशी पोस्ट रोहीत पवार यांनी प्रसिद्ध केली आहे.

शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला होता.

- Advertisement -

रोहित पवार कोण आहेत?

रोहित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू आहेत. पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा रोहित हा मुलगा आहे, म्हणजेच अजित पवारांचे नात्याने पुतण्या आहेत . रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.

पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.

रोहित पवार सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. कर्जत, हडपसर, पुरंदर येथून त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण पवार यांनी याबाबत अजून भाष्य केलेले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.