InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पवारांच्या नव्या पिढीचा शिलेदार कोण ?

- Advertisement -

शरद पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे. शरद पवारांची नवी पिढी म्हणजेच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे थोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार.

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे अजूनही राजकारणात सक्रिय झालेले नाही. पार्थ पवार हे येत्या लोकसभा निवडणुकीत मवाळ मतदारसांघातून लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहेत पण पार्थ पावर यांच्याकडून मात्र तसे संकेत येत नसल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे रोहित पवार हे नुसते सक्रीय झाले नाहीत, तर आपलं नेतृत्त्वही त्यांनी सिद्ध केले आहे. रोहित पवारांनी आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

रोहित पवार राजकारणात सक्रिय –

- Advertisement -

राजकारणासह कृषीक्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्रावर असणारे पवार यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. पवार यांचा हाच वारसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार हे सक्षमपणे सांभाळत आहेत.

रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.

पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.