महाराष्ट्राने केलेली सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात दिसेल; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्रानंतर झारखंड हा भाजपला दुसरा मोठा धक्का असेल. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झारखंडमधल्या निकालांवरून भाजपवर निशाणा साधलाय. शिवसेना ज्यांच्या विरोधात लढली त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. भाजपविरोधात सगळे पक्ष एकत्र आलेत. महाराष्ट्रातल्या या प्रयोगाची देशभर चर्चा होतेय. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

‘नागरिकत्व कायद्याला तरुणांनी केलेला जोरदार विरोधच भविष्यात सत्तांतर घडवेल’

2014मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा केली होती. त्यानंतर एक एक राज्य मिळवत बहुसंख्य राज्यात सत्ता मिळवली होती. मात्र प्रत्येक वेळी राजकारणात विजय मिळतोच असं नाही. त्यानंतर आता अनेक राज्य भाजपच्या हातातून जात आहेत त्यामुळे भाजपवर टीका करण्याची संधी रोहित पवारांनी सोडली नाही.

Loading...

झारखंडमध्ये विधानसभेत ‘त्या’ जागेवर राष्ट्रवादी पक्षाची आघाडी

रोहित पवार म्हणाले, झारखंड निवडणुकांमध्ये क्राँगेस व मित्रपक्ष आघाडीवर असल्याची बातमी आहे. जसे महाराष्ट्रात चित्र बदललं त्याचप्रमाणे झारखंडचे चित्र असेल. कुठेतरी महाराष्ट्राने केलेली ही सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात देखील दिसेल. झारखंडमधील काँग्रेस व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.