InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रोहित पवारांनी घेतली पुणतांब्यातील कृषी कन्यांची भेट..

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या पुणतांब्यातील तीनही मुलींची काल तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी थेट अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन या तीन मुलींची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.

मुलींची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी बळजबरीने मुलींच्या या आंदोलनावर कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईला आंदोलक मुलींनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला. मुलींचा विरोध असतानाही महिला पोलिसांनी उचलून रुग्णवाहिकेत टाकले. पुणतांब्यात कृषीकन्या गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत

रोहित पवार कोण आहेत?

गेली पाच दशकांपासून महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणात अग्रभागी असणारे नाव म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार. बारामतीचे आमदार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते थेट केंद्रातील कृषीमंत्रीपद शरद पवार यांनी सक्षमपणे सांभाळले आहे. पवार यांची तिसरी पिढी आता चांगलीच ऍक्टिव्ह झाल्याच पाहायला मिळत आहे. राजकारणासह कृषीक्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्रावर असणारे पवार यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. पवार यांचा हाच वारसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार हे सक्षमपणे सांभाळत आहेत.

रोहित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू आहेत. पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा रोहित हा मुलगा आहे, म्हणजेच अजित पवारांचे नात्याने पुतण्या आहेत . रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.

पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.