रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशाबद्दल केलं मोठं विधान

रोहित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वेळ साधत फेसबुक पोस्ट केली आहे.  ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’ असं म्हणत त्यांनी तिकिटासाठी भाजपमध्ये जाणाऱ्या राजकारण्यांवर आणि त्यांना आयात करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

या योजनेचं वैशिष्ट्य सांगतांना ते म्हणाले , मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना”, अशी एक नविन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू करण्यात आली आहे. कालपर्यन्त असणारी विचारधारा, राजकिय आरोप एक क्षणात नष्ट करत व्यक्तीस पवित्र करण्याची स्कीम, हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे .

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट-

Loading...

“मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना”, अशी एक नविन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू करण्यात आली आहे. कालपर्यन्त असणारी विचारधारा, राजकिय आरोप एक क्षणात नष्ट करत व्यक्तीस पवित्र करण्याची स्कीम, हे या योजनेचं वैशिष्ट्य.

आत्ता मुख्यमंत्रीच म्हणाले आहेत, आगे आगे देखों होता हैं क्या? तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले होते की आम्ही मुलेच नाही तर नातवंडे देखील पळवू. यांच्या या वाक्याचा अर्थ इतकाच की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांच आम्हाला काहीही घेणदेणं नसून फक्त गटातटाचं राजकारण करत आम्ही उमेदवार निवडुन आणण्यासाठी काहीही करु शकतो.

या सर्व राजकिय गोंधळात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला काही प्रश्न पडतात ते म्हणजे,

विकासाच राजकारण फसल्यामुळे, लोकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरल्यानेच सत्ताधारी आत्ता लोकांपुढे गटातटाचं राजकारण अजून तीव्रतेने घेवून जात आहेत का? मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून जाणिवपुर्वक भावनिक राजकारण खेळलं जाणार आहे का?

सत्ताधाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाचं कौतुक हेच आयात करण्यात आलेले उमेदवार करणार आहेत का?

आणि तस असेलच तर मला ठाम विश्वास आहे तो सर्वसामान्य लोकांवर, हे लोकच आत्ता विकासाच बोला, कामाचं बोला म्हणून प्रचारासभेतच यांना फैलावर घेतील.

रोहित पवार कोण आहेत?

रोहित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू आहेत. पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा रोहित हा मुलगा आहे, म्हणजेच अजित पवारांचे नात्याने पुतण्या आहेत . रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.

पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.

रोहित पवार सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. कर्जत, हडपसर, पुरंदर येथून त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण पवार यांनी याबाबत अजून भाष्य केलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.