नगरपंचायत निवडणुकांवरून रोहित पवारांचा भाजपाला सणसणीत टोला म्हणाले…

मुंबई : राज्यात नगरपंचायत निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचाय सर्वात जास्त चर्चेत होती. यावेळी या निवडणुकीत कर्जतमध्ये सत्ताबदल झाला आहे. भाजपाला यावेळी या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलं आहे.

कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकणू 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी पवार कुटुंब व महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्याच प्रमाणे राज्यातील भाजपच्या विविध नेत्यांनीही या निवडणुकी संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यातून उत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ नये म्हणून अपयश लवपवण्याचा प्रयत्न होत असला तरी अपयशामागील कारणमिमांसा किमान भाजप नेतृत्वाने तरी समजून घायला हवी!, असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा