Rohit Sharma | रोहित शर्माच्या ऐवजी ‘हे’ खेळाडू बनू शकतात भारताचे कसोटी कर्णधार

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघामध्ये एकापेक्षा एक खेळाडू आहेत. यामध्ये असे काही खेळाडू आहेत जे पुढील कसोटी मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या जागी संघाचे नेतृत्व करू शकतात. सध्याचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 35 वर्षांचा आहे. भारतीय संघाला असा कर्णधार हवा आहे की तो आगामी काळामध्ये संघाला पुढे नेऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतीय संघाकडे दोन खेळाडू आहे. जे कसोटी संघाचे कर्णधार होऊ शकतात.

रोहित शर्माच्या जागी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला भारतीय कसोटी संघाचे कर्णधार बनवले जाऊ शकते. जसप्रीत बुमराह फक्त 28 वर्षाचा आहे आणि टीम इंडियाला पुढे नेण्यासाठी त्याच्याकडे भरपूर वेळ देखील आहे. जसप्रीत बुमराह भारतीय संघामधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू असून त्याला कसोटी मध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद दिल्यास तो संघाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. भारतीय संघाला प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार हवा असेल तर रोहित शर्माकडे वनडेचे नेतृत्व आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला कसोटी संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

जसप्रीत बुमराह सोबत भारतीय संघातील स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सुद्धा भारतीय संघाचा पुढील कसोटी कर्णधार बनू शकतो. सध्या रवींद्र जडेजा भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाची कामगिरी खूप उत्कृष्ट आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याची कामगिरी तुफानी आहे. जडेजाच्या फिटनेस पाहता तो टीम इंडियासाठी दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळू शकतो. अशा परिस्थितीत जडेजाला भारतीय कसोटी कर्णधार बनवण्याचा विचार केला येऊ शकतो.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत टीम इंडियासाठी 30 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत 228 विकेट्स घेतले आहेत. तर दुसरीकडे रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी 60 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2523 धावा केलेल्या असून 242 विकेट घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.