Rohit Sharma | रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर क्रिकेट तज्ञांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे मानले जात आहे. परंतु बीसीसीआय नव्या कर्णधाराच्या शोधात आहे, अशा चर्चा देखील सुरू आहेत.

कोलकत्ता नाईट रायडर म्हणजेच केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे अभिषेक नायर यांनी भारतीय संघाच्या पुढील कर्णधाराबाबत आपले मत मांडले आहे. ते म्हणाले आहेत,”रोहितनंतर श्रेयस अय्यर भारतीय संघाचे उत्तम नेतृत्व करू शकतो. कर्णधार पदासाठी तो एक चांगला उमेदवार आहे. टी-20 संघाचे कर्णधार पद हार्दिक पांड्याकडेच कायम असू शकते. तर भविष्यामध्ये श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.”

पुढे बोलताना नायर म्हणाले,” श्रेयस अय्यरला आम्ही आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना पाहिले आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्सचे कर्णधार पद भूषविले आहे. तरुण वयामध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो सक्षम आहे. त्याचबरोबर तो फलंदाजीमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तो एक असा कर्णधार आहे, जो प्रत्येक खेळाडूला त्याच्या पद्धतींना खेळण्याचे स्वातंत्र्य देतो.”

श्रेयस अय्यर सध्या आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्याचबरोबर त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटलचे देखील नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधार पदाचा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स आयपीएल फायनलपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे श्रेयस अय्यर रोहितनंतर भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळू शकतो.

महत्वाच्या बातमी

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.