Rohit Sharma । आम्हाला या दोन पराभवांची फारशी चिंता नाही, पत्रकार परिषदेत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

दुबई : सलग दोन पराभवांसह भारतीय संघ आशिया कप 2022 मधून बाहेर होण्याच्या मार्गावर असला तरी कर्णधार रोहित शर्मा याला त्याची अजिबात पर्वा नाही. रोहित शर्माने म्हटले आहे की, या दोन पराभवांमुळे संघाला अजिबात चिंता नाही आणि ड्रेसिंग रूममध्ये असे काही घडत नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्याने हे वक्तव्य केले.

आशिया चषक स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाचा 6 विकेट राखून पराभव केला. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते पण श्रीलंकेने १९.५ षटकांत हे लक्ष्य गाठले. या पराभवामुळे आता भारतीय संघाच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा मावळल्या आहेत. भारतीय संघाला सुपर-4 टप्प्यात लागोपाठ दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यामुळे संघाचे आशिया चषक विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितले की, “आम्हाला या दोन पराभवांची फारशी चिंता नाही. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये असे बोलत नाही कारण गेल्या विश्वचषकापासून आम्ही बरेच सामने खेळलो आणि बरेच सामने जिंकले. आम्ही हे सलग दोन सामने गमावले पण काळजी करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. अनुभवी खेळाडूही बाद होतात आणि त्यांच्याविरुद्धही धावा होतात, असे मला वाटत नाही, असं तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.