RRR | अभिमानस्पद! हॉलीवुडमध्ये पुन्हा एकदा भारतीय चित्रपटाचे वर्चस्व, RRR ठरला जगातला सर्वोत्कृष्ट चित्रपट

RRR | टीम महाराष्ट्र देशा: एस एस राजामौली (SS Rajamouli) यांनी दिग्दर्शित केलेला ‘आरआरआर’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. हा चित्रपट भारतासह जगात भारी सिनेमा ठरला आहे. नुकताच या चित्रपटाने ‘हॉलीवुड क्रिटिक असोशियन अवॉर्ड 2023’ (HCA Film Awards) पटकावला आहे. हा पुरस्कार सोहळा जगातील मानाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारावर ‘RRR’ ने आपलं नाव कोरलं आहे. ‘RRR’ ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘RRR’ ने बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट सॉंग पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासोबतच ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंगसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील मिळाला होता. ‘RRR’ या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि आलिया भट यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये अजय देवगन यांनी देखील महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ‘नाटू नाटू’ हे गाणं एम एम केरावणी यांनी कंपोज केलं आहे.

हॉलीवुडमध्ये RRR चे वर्चस्व (RRR dominates Hollywood)

स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि एडगर राइट यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांनी ‘RRR’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट अमेरिकेतील 200 पेक्षा अधिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स (Variance Films) ने घेतला आहे.

या चित्रपटामध्ये 1920 मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामाराजू यांची कथा दाखवण्यात आली आहे. ‘RRR’ या चित्रपटाने जागतिक पातळीवर 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.