InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बेपत्ता ‘एएन३२’चे अवशेष अरूणाचल प्रदेशात; १३ जवान ठार

- Advertisement -

बेपत्ता झालेल्या एएन३२ विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात आढळले आहे. बचाव दलाने याची पुष्टी केली असून या विमानात असणारे सर्व १३ जवान ठार झाले आहेत. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मिळाल्याच्या ठिकाणी आज सकाळी १५ सदस्यीय बचाव पथक दाखल झाले होते.

- Advertisement -

मंगळवारी, भारतीय हवाई दलाच्या एएन ३२ या विमानाचे अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले. अपघाताचे ठिकाण अतिशय उंचावर आणि घनदाट जंगलात आहे. त्यामुळे विमानाचे अवशेष असलेल्या ठिकाणी पोहचणे हे आव्हानात्मक काम होते. अपघातात ठार झालेल्या १३ जवानांमध्ये ६ अधिकारी आणि ७ एअरमन यांचा समावेश होता. अपघातग्रस्त विमानांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी १५ सदस्यीय बचाव पथकाला हेलिड्रॉप करण्यात आले होते. यामध्ये हवाई दल, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहक यांचा समावेश होता.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.